कोल्हापुरातून 4 जागा द्या | विनय कोरे यांची महायुतीकडे मागणी. | Vidhansabha Election 2024

जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 15 जागा लढण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 15 जागांची मागणी भाजप पक्ष्याकडे केली. Vidhansabha Election 2024

Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024

जनसुराज्य शक्ती

विनय कोरे हे मराठी राजकारणी आहेत. यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून ते महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.

ऑक्टोबर २००९ च्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी ८३११ मताधिक्‍याने विजय मिळविला.कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. हातकलंगले शाहूवाडी पन्हाळा करवीर चंदगड आजरा या भागांमध्ये त्यांचे वर्चस्व राहिलं

कोल्हापूरच्या ह्या चार जागेसाठी मागणी :-

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनायक कोरे यांची मोलाची सात युतीला लाभली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांचे प्रचार प्रमुख म्हणून विनायक कोरे यांची नेमणूक करण्यात आली होती व त्यांनी ती जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पाडली व धैर्यशील संभाजीराव माने यांचा विजय झाला.

महायुतीमध्ये पंधरा जागांची मागणी आमदार विनायक कोरे यांनी केलेले आहे, त्यामध्ये कोल्हापूरच्या चार, सांगलीच्या दोन या जागांचाही समावेश आहे. या सर्व जागेवर निवडणूक लढवायची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर मधील ४ जागा

  • शाहुवाडी पन्हाळा
  • हातकणंगले
  • चंदगड गडहिंग्लज
  • करवीर

सांगलीत दोन जागांची मागणी

सांगली जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याचे जनसुराज शक्ती समित कदम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी म्हटलं आहे. मिरजेत शिवसेना (शिंदेसेना) व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्रपक्षानेही मिरज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. मिरज मतदारसंघाचे मंत्री सुरेश खाडे आमदार आहेत.

  • जत
  • मिरज

कोरे पत्रकारानंशी बोलताना असे म्हणाले

लोकसभेला आम्ही कोणतीही जागा न मागता बिनशर्त पाठिंबा हा महायुतीला, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी दिला होता. आणि तशा प्रकारचे यश आम्ही कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघांमध्ये मिळवून देखील दिलं. लोकसभेवेळी अशी भूमिका मांडली होती की विधानसभेला मात्र महायुतीने आम्हाला सन्मान जनक जागा द्याव्यात. आणि तशा प्रकारचा 15 जागांचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीला दिलेला आहे. त्याच्यावर वाटाघाटीच्या फेऱ्या आता सुरू झालेले आहेत.

प्रामुख्याने तीन आमदार तरी पूर्वी ज्या आमच्या विभागामध्ये होते त्यामध्ये हा देखील विभाग ( करवीर ) येतो. शाहूवाडी and पन्हाळा, हातकणंगले, आजरा चंदगड या चार जागा आम्ही प्रामुख्याने मागितले आहेत. तसेच मिरज व जत हे सांगलीतले मतदारसंघ आपण त्यांच्याकडे मागितलेले आहेत सोलापूर मधले काही मतदारसंघ आहेत नांदेड जिल्ह्यातला देगलूर बिलोली हा एक मतदार संघ आहे, परभणी जिल्ह्यातला एक मतदार संघ आहे तसेच नगर जिल्ह्यातील काही मतदारसंघ आहेत अशी चर्चा प्रामुख्याने चालू आहे.

करवीरच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले

करवीरच्या प्रत्येक घरापर्यंत संताजी बाबाच्या रूपाने आमचाच माणूस पोहोचला आहे. गेले तीन वर्ष हे काम सातत्याने चालू आहे, त्यामुळे करवीरची यश हे निश्चित आहे. जनसुराज्य पक्ष हा प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे आम्ही करवीर सह हे चार मतदारसंघ मागितले आहेत. जिथे आज महायुतीचा आमदार नाही, तिथे ज्याची ताकद चांगली आहे, मोठी आहे, सर्वे ज्याच्या बाजूने आहे त्याच बाबतीत महायुतीला निर्णय घ्यावा लागेल.

करवीर मतदार संघात जागावाटपावरून पेच निर्माण

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी करवीर मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघावर डोळा ठेवला आहे.

लोकशाहीत सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा आणि जागेवर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र, महायुतीचे नेतेच त्याबाबतचा निर्णय घेतील. जागा वाटपात जी काही नियमावली आहे, त्यानुसारच जागावाटप होईल, असं चंद्रदीप नरके (Chandradeep Narake) यांनी सांगितलं.

त्यावर बोलताना नरके यांनी अशी प्रतिक्रिया दिली की जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित करत असतील तर पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत, असा इशारा नरके यांनी दिला. गुरुवारी विनय कोरे यांनी करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मेळावा घेत आपला उमेदवार जाहीर केला होता.

शिवाय करवीरचा आमदार हा जनसुराज्य पक्षाचाच असेल, असा विश्वास देखील कोरे यांनी व्यक्त केला. यावर बोलताना नरके म्हणाले, “मी करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे. मात्र, शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघांतही शिवसेनेकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत.”

but

so

so

but

so

because

so

but

because

so

but

so

but

because

And

Leave a Comment