कोल्हापूरच्या पट्ट्यांनी ऑलिम्पिक गाजवलं | ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्राचा झेंडा

Swapnil Kusale wins bronze in paris olympics: पॅरिस मध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी होते. अशाच एका महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपल्या देशासाठी कांस्यपदक जिंकलं

Swapnil Kusale wins bronze in paris olympics
Kusale wins bronze in paris olympics

Swapnil Kusale wins bronze in paris olympics

पॅरिस मध्ये चालू असलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसाळे यांनी आपल्या देशासाठी कांस्यपदक जिंकले. भारताच्या खात्यात अजून एका पदकाची भर पडलेली आहे, स्वप्निल हा ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये सहभागी होता. त्यांनी अंतिम फेरीत धडक मारत हे मोठे यश संपादन केलेले आहे.

त्याने केलेल्या कामगिरीबद्दल सर्व क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच कौतुकही होत आहे. स्वप्निलच्या या यशानंतर महाराष्ट्राची मान देशांमध्ये उंचावली आहे. महाराष्ट्र सरकारने हे कौतुक करण्यासोबतच त्याला एक कोटी रुपयाचे बक्षीस सुद्धा जाहीर केले आहे.

कसा जिंकला स्वप्नील…!

५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारांमध्ये अंतिम फेरीमध्ये एकूण आठ खेळाडू होते. सर्वच स्पर्धक अगदी मातब्बर होते,

अंतिम सामन्यांमध्ये प्रत्येकाला चाळीस शॉट्सची संधी दिली होती, व त्यानुसार स्पर्धकाला गुण दिले जात होते. सर्वात कमी गुण असलेला स्पर्धक स्पर्धेतून बाहेर होत होता, कमी गुण असलेले दोन स्पर्धक स्पर्धेतून बाहेर झाले.

पुढील फेरीमध्ये प्रत्येकी एक-एक खेळाडू बाहेर होत गेला. पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्निल पाचव्या स्थानावर होता, नंतरच्या फेरीत स्वप्नीलने चांगली कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली.

शेवटपर्यंत युक्रेनचा खेळाडू पहिल्या तर चीनचा खेळाडू दुसऱ्या आणि भारताचा स्वप्निल तिसऱ्या स्थानावर राहिला. स्वप्निल आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूच्या गुणांमध्ये फार फरक असल्यामुळे स्वप्नीलचा तिसऱ्या क्रमांक निश्चित झालेला होता. अखेर स्वप्निल ने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलेच

महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाशाबा जाधव यांच्या नंतर महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऑलम्पिक मध्ये पदक जिंकलेले आहे.”

Who is Swapnil Kusale..? स्वप्निल कुसाळे बाबत थोडी माहिती

स्वप्निल कुसाळे हा महाराष्ट्राचा असून कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे मूळ गाव हे राधानगरी तालुक्यामध्ये आहे. 6 ऑगस्ट 1995 मध्ये स्वप्निलचा जन्म झाला. स्वप्निल चा सुरुवातीपासून ते ऑलम्पिक पर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. या यशामागे त्यांच्या वडिलांचा देखील मोठा हात आहे.

स्वप्नील च्या वडिलांनी त्याला वयाच्या 14 व्या वर्षे महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले होते तिथूनच त्याचा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले, व पुढील शिक्षणासाठी त्याने पुण्याचा रस्ता धरला. पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलावर तो सराव करत असत. तसा तो आत्ता रेल्वे मध्ये टी.सी. या पदावर आहे.

महाराष्ट्रातील पॅरिस ओलंपिक स्पर्धेसाठी साठी पात्र झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने 50 लाखाची मदत केली. याच्या जोरावरच स्वप्निल कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूंनी कोल्हापूर ते ऑलम्पिक पर्यंतचा खडतर प्रवास सर केला.. ” Kusale wins bronze in paris olympics”

वडील शिक्षक, आई गावची सरपंच, धोनी चा चाहता…!

स्वप्नील कुसळे २०१५ पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. त्याचे वडील आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे. त्याच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, ‘आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनू भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. ती जिंकू शकते तर आपणही जिंकू शकतो.

ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्यानंतर तो म्हणाला होता, की ‘मी नेमबाजीत कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. पण इतर खेळांमध्ये धोनी माझा फेव्हरेट आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तोदेखील एके काळी टीसी होता आणि मी सुद्धा.’

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..!

शाब्बास… स्वप्नील तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस.

तसेच मीडिया सोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…! स्वप्निल चे रोप्य पदक अवघ्या 0.1 गुणांनी हुकले आहे. तरी त्यांनी कांस्यपदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी 72 वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्निल ला एक कोटी रुपयांची पारितोषिक दिले जाईल.

त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक आई-वडील यांचा यथोचित सत्कारी केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी

आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्निल ने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे या यशासाठी घुसाळे

कुटुंबीयासह त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आदींची मेहनत महत्त्वाची ठरली आहे.

एक कोटी रुपयाचे बक्षीस

स्वप्नीनने केलेल्या कामगिरीबद्दल सर्व क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच कौतुकही होत आहे. स्वप्निलच्या या

यशानंतर महाराष्ट्राची मान देशांमध्ये उंचावली आहे. महाराष्ट्र सरकारने हे कौतुक करण्यासोबतच त्याला एक कोटी रुपयाचे बक्षीस

सुद्धा जाहीर केले आहे.

Swapnil Kusale wins bronze in paris olympics

मोदींकडूनही कौतुकाची थाप…!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी नेमबाज स्वप्नील कुसळे यांना फोन वरून पॅरिस ऑलम्पिक मध्ये जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

मोदींनी शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की स्वप्निलच्या या उपलब्धी बद्दल भारतीय खूप खुश आहेत. स्वप्निल चे ऑलम्पिक 2024

मधील हे प्रदर्शन खूप चांगले राहिले त्यामुळेच त्यांना कांस्यपदक मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट

“स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! स्वप्निलचं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये

कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण त्याने कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात

पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे”, अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वप्निलचं

अभिनंदन केलं आहे.

अमित शाहा यांच्याकडून देखिल शुभेच्छा.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही स्वप्निलचं अभिनंदन केलंय. “कांस्य पदक जिंकल्याबद्दल तुझा अभिमान वाटतो. क्रीडा क्षेत्रातील

आव्हानं स्वीकारण्यासाठी लाखो लोकांसाठी तुझा विजय हा प्रेरणादायी असणार आहे. असाच जिंकत राहा”, अशा शब्दात गृहमंत्र्यांनी

स्वप्निलचं तोंडभरुन कौतुक केलंय.

Leave a Comment