शरद पवारांचे टेन्शन वाढलं..? यावेळीही तुतारीसह ‘पिपाणी’ वाजणार…

शरद पवारांचे टेन्शन वाढलं | यावेळीही तुतारीसह ‘पिपाणी’ वाजणार : तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या चिन्हांचा वाद लोकसभेवेळी गाजला होता, मध्यंतरी निवडणूक आयोगाने तुतारी गोठवलेले पत्र समोर आलं होतं. मात्र आज दोन्ही चिन्हंमध्ये फरक असल्यामुळे ते कायम असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये दिली. sharad pawaranch tension vadla

sharad pawaranch tension vadla
sharad pawaranch tension vadla

शरद पवारांचे टेन्शन वाढलं..?

लोकसभा निवडणुकीनंतर तुतारी नावाचे चिन्ह जे शरद पवार यांच्या तक्रारीनंतर गोठवलेलं होतं तेच चिन्ह हटवता येत नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्याला कायम ठेवले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत ही तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी ही दोन्ही चिन्ह असणार आहेत, त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे टेन्शन तुतारी वाढवणार का असा प्रश्न निर्माण होतो.

तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या चिन्हांचा वाद लोकसभेवेळी गाजला होता, मध्यंतरी निवडणूक आयोगाने तुतारी गोठवलेले पत्र समोर आलं होतं. मात्र आज दोन्ही चिन्हंमध्ये फरक असल्यामुळे ते कायम असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये दिली.

लोकसभेला मात्र काही मतदारसंघात फक्त तुतारी हे चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आले. यातील दोन चिन्हांमध्ये फक्त तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हाच फरक होता. त्यामुळे लोकसभेवेळी काही मते चिन्हाचे नाव साम्य असल्यामुळे अपक्षांना गेल्याचे शरद पवार गटाचा दावा होता sharad pawaranch tension vadla

चिन्हांची पार्श्वभूमी पाहूया…

अजित दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी मध्ये 2 गट पडले, मूळ राष्ट्रवादी पक्षाची मालकी आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगांने अजित दादांना देले…. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले.

लोकसभेला मात्र काही मतदारसंघात फक्त तुतारी हे चिन्ह काही अपक्ष उमेदवारांना देण्यात आले. यातील दोन चिन्हांमध्ये फक्त तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हाच फरक होता. त्यामुळे लोकसभेवेळी काही मते चिन्हाचे नाव साम्य असल्यामुळे अपक्षांना गेल्याचे शरद पवार गटाचा दावा होता.

कुठे तीन नंबरची मते तर कुठे कुठे लाखाहून अधिक मते तुतारी या चिन्हाच्या अपक्ष उमेदवारांनी घेतली होती, त्यामुळे लोकसभेनंतर निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटांनी तुतारी हे चिन्ह गोठवावे अशी तक्रार केली होती. तक्रारीत चिन्ह व नाव हे सेम असल्यामुळे गोंधळावरून तुतारी आणि पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली.

16 जुलै 2024 ला राज्य निवडणूक आयोगाने तुतारी आणि बिगुल हे दोन्ही चिन्ह गोठवल्याचे परिपत्रक काढले. व शरद पवार गटाला दिलासा दिला होता.

पण आज केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्हात साम्य नसून ते गोठवलं नसल्याचे सांगितले, थोडक्यात राज्य निवडणूक आयोगाचे पत्र काढून तुतारी व बिगुल हे चिन्ह गोठवल्याचे सांगितले होते त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. sharad pawaranch tension vadla

तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी यातील फरक समजून घेऊया.

लोकसभेला जे अपक्षांना ट्रंपेट चिन्ह दिले गेले होते त्याला मराठी भाषेमध्ये साधारणतः पिपाणी म्हटले जाते पण

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर त्याचे इंग्लिश नाव ट्रंपेट आणि हिंदी नाव तुरही असे दिले होते, त्यामुळे लोकसभेला

शरद पवार गटाचे नेते आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा प्रचार फक्त तुतारी म्हणून करत होते आणि त्याच तुतारी

नावाच्या घोषणा अपक्षांच्या रॅलीतील होत होत्या. sharad pawaranch tension vadla

तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रंपेट या चिन्हाला किती मतं पडली होती मतदार संघ निहाय पाहूया.

लोकसभा निवडणुकीत तुतारी व तुतारी वाजवणारा माणूस ह्या चीन्हातला फरक न समजल्यामुळे मतदारांचा गोंधळ

झाल्याचा आरोप शरद पवार गटाने केला होता, तर बगुया कोणत्या कोणत्या मतदार संघात किती मते मिळाली.

सातारा

सातारा लोकसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस यांचा 32 हजार

771 मतांनी पराभव झाला. त्याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय गाडे चिन्ह तुतारी ( पिपाणी ) यांनी 37 हजार 62 मते मिळवली.

अहमदनगर

अहमदनगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंके तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर 28 हजार 929 मतांनी

विजयी झाले इथेच ट्रंपेट या चिन्हावर राहिलेले अपक्ष उमेदवार गोरख आळेकर 44957 मध्ये पडली.

बीड

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर फक्त

6000 मताच्या फरकाने विजयी झाले इथे तुतारीचे अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांनी 54850 मतं घेतली होती.

दिंडोरी

दिंडोरी मतदार संघामध्ये शरद पवार गटातुन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर भास्कर भगरे यांनी एक लाख 13

हजार 199 मतांनी विजयी झाले त्यांच्याविरोधात तुतारीवर अपक्ष लढलेल्या बाबू भगरे यांनी एक लाख 3 हजार 632 मते घेतली.

रावेर

रावेर लोकसभेमध्ये शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर दोन लाख 72 हजार

मतांनी पराभव झाला इथे तुतारीवर लढलेले एकनाथ साळुंखे यांनी 43 हजार 982 मते घेतली

sharad pawaranch tension vadla

Leave a Comment