मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा | केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Marathi Language

Marathi Language

Marathi Language
Marathi Language

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने यांच्या पुढाकाराने मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. Marathi Language

महाराष्ट्रातील मराठी भाषेला भारतीय केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल. सर्व महाराष्ट्रामधून केंद्र सरकारचे कौतुक होत आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषेचा स्तर उंचावणार असून मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साधा समुद्र पार जगभरात आणखी जास्त वेगाने प्रभावपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना ऊर्जा देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. Marathi Language

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा

मराठी भाषेसह केंद्र सरकारने बंगाली, आसामी, पाली, आणि प्राकृत आश्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची गोड बातमी दिली.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री

“आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.

केंद्राच्या या निर्णयावर नेत्यांच्या प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे जनतेमधून अनेक प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेले आहेत. काही राजकीय नेत्यांनी ही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की “हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नितीन गडकरी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राचे सांस्कृतिक तथा मराठी भाषामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी ३५ वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, तेव्हापासूनची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ३५० सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आनंद आणि अभिमान आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आम्ही मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करू. या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची समिती तयार करून व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज ठाकरे

राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली पतिक्रिया दिली, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. लोकसभा निवडणूकीवेळी महायुतीला पाठिंबा देत…असताना शिवतीर्थावर मा. राजसाहेब ठाकरे यांनी मा. नरेंद्र मोदीजींसमोर ठामपणे ही मागणी केली होती.पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक आभार !!

अभिजात भाजेचा दर्जा कधी मिळतो

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

1) प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

2)भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.4)

३)भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत.

4)’अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

५)प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा

कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय बदल होतात?

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत

•मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं

•भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं

•प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं

•महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं

•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं

Leave a Comment