Maharashtra assembly election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संदर्भात घेतलेल्या प्रमुख निर्णयांची माहिती महाराष्ट्रातील जनतेला दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारीख..?
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीमने दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. राजीव कुमार यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीची तयारी कशी केली जात आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. ‘आपले मत आपला हक्क’ हा निवडणूक कार्यक्रम राज्यात राबविला जाणार आहे. तसेच, निवडणुका कधी घेतल्या जाणार, याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
कधी होणार निवडणुका…?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १,००, १८६ मतदान केंद्रे असतील. मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्र लोकशाहीच्या उत्सवात चांगले योगदान देईल. आगामी सण आणि उत्सवाच्या नंतर निवडणुका जाहीर कराव्यात असे राजकीय पक्षांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले. दोन दिवस आम्ही राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा केली.
निवडणूक आयोगाने या दौऱ्यात बसपा, आप, सीपीआय, मनसे, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्यासहित ११ पक्षांची भेट घेतली आणि त्यांची मते जाणून घेतली. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी, असे सर्वांनी मिळून सांगितल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील असे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय निवडणूक पथक :-
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक पुढील शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस केंद्रीय पथकने राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
शुक्रवारी सकाळी १० वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक झाली असून दुपारी तीन वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारीख..
विविध राजकीय पक्षांच्या मागण्या :-
दोन दिवस निवडणूक आयोगाने राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यावेळी प्रत्येक पक्ष्याच्या प्रतिनिधीला आपले मत मांडणाच्या अधिकार निवडणूक आयोगाने दिला. प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षांचे मत निवडणूक अधिकाऱ्यांपुढे मांडले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याचीही विनंती केली.
तर काहींनी मतदान केंद्र दूर असल्याने वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली.
निवडणुकीची तारीख सोयीची असावी, अशीही पक्षांची मागणी आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांना पुन्हा असे अनुभव येऊ नयेत.
तसेच फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी. काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा, अशीही विनंती केली. तर मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही काही पक्षांनी केली.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारीख..
शिवसेनेचे राहुल शेवाळे काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आणि त्यासंदर्भात काही सूचना असल्यास माहिती घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम मुंबईत दाखल झाली आहे. निवडणूक खर्च २० लाख रुपयांनी वाढवावा, कारण महागाई वाढली आहे, सगळ्याच पक्षांनी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली, असं राहुल शेवाळे म्हणाले.
राष्ट्रवादीचे अनिल पाटील काय म्हणाले?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक
आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना :-
योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
योजनेसाठी कोण पात्र आहे..?
1) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते.
आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा
सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत
२) सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
३) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
४) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर
अशाबाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”
५) रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या
दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
अशी तपासा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी
सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या या 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे.
होम पेजवर आल्यानंतर चेक लाभार्थी यादीचा पर्याय आपल्याला दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
आता आपल्या स्क्रीन वरती एक नवीन पेज दिसणार आहे यामध्ये अर्जदाराला विचारले सर्व तपशील टाकून घ्या .
सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचा आहे.
योजनेमध्ये महत्त्वाचे ७ बदल खालील प्रमाणे :-
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता ती दि.31 ऑगस्ट,
2024 पर्यंत वाढवली आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्धनसेल तर त्या
ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला.
या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा
बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”
६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना
उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.