Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही आमदारांच्या व मंत्र्यांच्या सूचनेनुसार, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सात मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे अगदी कमी कागदपत्रांमध्ये या योजनेसाठी अर्ज आपण करू शकतो, या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
परंतु अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची खूपच धावपळ उडाली होती. कागदपत्र काढण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागल्यामुळे नागरिकाकडून कागदपत्रामधील अटी थोड्या शिथिल करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच काही आमदारांनी सुद्धा सरकारकडे मागणी केली होती.
त्याच मागणीचा विचार करून सरकारने योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये व अटींमध्ये खूप बदल केला आहे. यामुळे पात्र महिलांसाठी अर्ज करणे व कागदपत्राची जुळवा जुळव करणं ही सोपं झालेलं आहे.
योजनेमध्ये महत्त्वाचे ७ बदल खालील प्रमाणे :-
1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता ती
दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत वाढवली आहे. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना
दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध
नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा
बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”
६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना
उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Ladaki Bahin Yojana
ऑनलाईन अर्ज करा | क्लिक करा |